fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ॲक्युपंक्चर ही वेदना कमी करणारी प्राचीन भारतीय उपचार प्रणाली

पुणेः बदलत्या जीवनशैलीमुळे पाठ, मान, कंबरदुखीचे वाढणारे आजार आणि कमी वयात त्यावर केल्या जाणाऱ्या ऑपरेशनची संख्या वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या आजार कसे बरे करता येतील याकडे सर्वांचा कल असतो. ॲक्युपंक्चर ही वेदना देणारी नाही तर वेदना कमी करणारी प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ओम ॲक्युपंक्चर ॲन्ड हीलींग सेंटर यांच्यावतीने
ॲक्युपंक्चर उपचार प्रणालीची माहिती देण्यासाठी “रंध्रात पेरिली मी” या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात ॲक्युपंक्चर या 

उपचारपद्धती विषयी तज्ज्ञ विजया नकाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ वैद्यकिय तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे,  गायक विजय केळकर, पं विनोदभूषण आल्पे,  हर्षा शाह, पप्पिश कुमार ललगूनकर, राजेश दातार, स्वाती शहा, अविनाश निमसे, विवेक जडे, सतिश मराठे, श्याम भोरे व मोना भोरे आदी उपस्थित होते.

विजया नकाते म्हणाल्या, ॲक्युपंक्चर ही  प्राचीन भारतीय  उपचार प्रणाली असून निरामय आणि निरोगी आयुष्य देणारी आहे. यामध्ये कोणत्याही औषधाचा वापर केला जात नाही. तर नैसर्गिकरीत्या शरीरातील शक्ती वाढवून आजार बरे करण्यावर भर दिला जातो. रुग्ण कसे आणि कधी बरे होणार हे त्यांच्या आजारावर अवलंबून असते. त्याचबरोबर या उपचार प्रणालीवर तुमचा विश्वास असणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी योगिता बडवे, गौरी पुंडलिक, कल्पना नारायण, विदुला पंडित आणि मयुर पांडे यांनी हिंदी मराठी चित्रपटातील विविध गीतांचे सादरीकरण केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले, किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. अजित कुमठेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading