रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकणाला नव वळण: बंदुकीचा धाक दाखवून कुचिक यांनी सह्या घेतल्याचा पीडितेचे आरोप
पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका पीडित तरूणीने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ तरुणीच्या मदतीसाठी पुढे आल्या. मात्र या तरुणीने चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्याविरोधात जबरदस्ती पोलीस तक्रार दाखल करण्यास आणि जबाब देण्यास भाग पाडलेअसल्याचे गंभीर आरोप केले त्यानंतर या प्रकणाला एक नवे वळण लागले होते. मात्र आज पुन्हा तरुणीने माध्यमांसमोर येत कुचिक बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणुन बंदुकीच्या धाक दाखवून सह्या घेतल्या असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे या प्रकणाला आणखी नवे वळण लागले आहे.
पीडित तरुणीने परत कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत रघुनाथ कुचिक यांनी बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आहे. जर गुन्हा मागे घेतला नाही तर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी कुचिक यांनी दिली असाही आरोप या पीडित तरुणीने केला आहे. तसेच बंदुकीचा धाक दाखवून समजूतीच्या करारावर सह्या घेतल्या असल्याचेही तरुणीने यावेळी सांगितले आहे. याबाबत पीडित तरुणीने मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-मेल पाठवत न्याय देण्याची मागणी केली आहे.