पं. संजय करंदीकर आणि पं. आनंद बदामीकर यांना तालमार्तंड कै. रंगनाथबुवा देगलूरकर पुरस्कार जाहीर 

पुणे : तालमार्तंड कै. रंगनाथबुवा देगलूकर पुरस्कार तबला वादक पं. संजय करंदीकर (पुणे) आणि पं. आनंद बदामीकर (सोलापूर) यांना जाहीर झाला आहे. रविवार, दिनांक २४ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती आयोजक शिवदास देगलूरकर यांनी दिली.

ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक फाटक आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. जयराम पोतदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे खंडित झालेले मागील दोन वर्षांचे पुरस्कार या वर्षी प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात पं. संजय करंदीकर आणि पं. आनंद बदामीकर यांचे वादन होणार आहे. तर आसावरी देसाई देगलूरकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना नरसिंग देसाई (संवादिनी) ओंकार देगलुरकर (तबला) साथसंगत करणार आहेत.

तालमार्तंड कै. रंगनाथबुवा देगलूरकर यांच्या सांगीतिक कार्याच्या स्मृती उजागर करण्यासाठी ताल वादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला तालमार्तंड कै.रंगनाथबुवा देगलूरकर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Leave a Reply

%d bloggers like this: