भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत, VHP च्या माजी अध्यक्षांनी हिंदुत्ववाद्यांचे कान टोचले

नागपूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतर राज्यात माशीदीवरील भोंगे विरूद्ध हनुमान चालिसा असे चित्र पाहायला मिळत आहे. या संदर्भात राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची देखील बैठक होणार आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी ‘या’ हिंदुत्ववाद्यांचे कान टोचले आहे. “भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत”, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला आहे.      

तोगडिया म्हणाले, विश्व हिंदू परिषदेचा भोंग्यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंग्यांबाबत न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे राज्य असताना भोंगे का हटवले नाहीत, असा प्रश्न तोगडीया यांनी उपस्थित केला आहे. तसेच आताही ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे, त्या राज्यात भोंगे का हटवले जात नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नियमानुसार कोणतीही कारवाई का होत नाही? असेही त्यांनी विचारले आहे. 

काय म्हणाले तोगडीया?

एका महिन्यात काश्मीरी पंडितांसोबत राहा.

Pok मध्ये संघाच्या शाखा लावा. मी स्वतः शाखेत नमस्ते ‘सदा वस्तले’ करायला येईल.

पाकिस्तानमध्ये घुसा आणि मोहन भागवत स्वतः टॅंक घेउन जा. मी स्वतः ते टॅंक स्वच्छ करीन

पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल तर हिंदूंनी सावधान असले पाहिजे

 

Leave a Reply

%d bloggers like this: