‘हिंदू राष्ट्रासाठी ४ मुलं जन्माला घाला अन् … साध्वी ऋतंभरा यांचे वादग्रस्त विधान

कानपूर : प्रत्येक हिंदूला आता चार मुले झाली पाहिजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी आणि उरलेली दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) यांच्याकडे सोपवली जावी जेणेकरून ते राष्ट्रीय बलिदानात योगदान देऊ शकतील, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी ऋतंभरा यांनी केले आहे. 

कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

पुढे बोलताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, प्रत्येक हिंदूला आता चार मुले झाली पाहिजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी आणि उरलेली दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) यांच्याकडे सोपवली जावी जेणेकरून ते राष्ट्रीय बलिदानात योगदान देऊ शकतील. ते पुढे म्हणाले की, आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट असले पाहिजे.

हिंदू राष्ट्रासाठी जाती-पातींमधून बाहेर पडा

यावेळी साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, “हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर या. राष्ट्रीय स्वाभिमान असायला हवा. कोणताही राजकीय पक्ष जातींचं गाजर दाखवून आपल्याला भुलवू शकत नाही. माझा देश आणि माझ्या देशाचं भलं सर्वतोपरी असायला हवं. हिंदू जातीचा हाच मंत्र असायला हवा”.

Leave a Reply

%d bloggers like this: