‘सोयी आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व..’; राज ठाकरे यांनीच रेखाटलेल्या व्यंगचित्रांतून त्यांच्यावर टीका
राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे पुण्यात चौकाचौकात लागले बॅनर
पुणे : राज ठाकरे हे उत्तम राजकारणी तर आहेतच तसेच ते उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. ते नेहमी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे व्यंगचित्र काढण्यात व्यस्त असतात. सध्या राज ठाकरे यांनी राज्यात भोंग्यांचा मुद्दा उचलून थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. मनसेच्या या बदलत्या अजेंड्यावर राज्यातील अनेकांनी टीका केली. तर काहींनी त्यांचे समर्थनही केले आहे. असे असताना आता पुणे शहरात राज ठाकरे यांच्यांच एका जुन्या व्यंगचित्रांचे फलक चौकाचौकात पाहायला मिळत आहे. ‘सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व.. ‘असे या फलकावर लिहिले असल्याने या होर्डिंग्जची शरभर चर्चा रंगली आहे.
पुण्यातील अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुड मधल्या करिष्मा चौक इथं हे निनावी होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. या होर्डिंग्ज वर लिहिले आहे की, “अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि ‘श्री राम मंदिर’ला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व.
या होर्डिंग्जमध्ये राज ठाकरे यांनी स्वत:च काढलेले व्यंगचित्र दाखवण्यात आले असून अशी वेळ कोणावरही येऊ नये”, असे लिहिण्यात आले आहे