शांताराम भोंडवे यांनी पर्यावरणाशी, वृक्ष, वल्लींशी ‘स्नेहबंध’ जोडला : श्रीनिवास पाटील

पिंपरी : आपल्या मुलांच्या डोक्यात मोठं होण्याचं बीज कसे पेरावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शांताराम भोंडवे होय. बीएससी (ॲग्री) शिक्षण घेऊन बँकेच्या नोकरीत न रमणारा शांताराम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उद्यान अधिक्षक म्हणून सेवेत रुजू झाला. त्यानंतर त्यांनी पर्यावरणाशी आणि वृक्ष, वल्लींशी आपला ‘स्नेहबंध’ जोडला आणि जीवनाच्या शेवटापर्यंत जपला. त्यांचा वारसा संकेत भोंडवे आणि त्यांच्या कुटूंबियांनी पुढे सुरु ठेवला आहे. पर्यावरण रक्षणाचे हे कार्य सर्वांनी सुवर्ण पिंपळाच्या बीजांचे रोपण आणि संर्वधन करीत पुढे सुरु ठेवावे असे प्रतिपादन खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त उद्यान अधीक्षक स्व. शांताराम भोंडवे यांच्या दहाव्या स्मृतिवर्षानिमित्त भोंडवे कुटूंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हरित राजा’ या कार्यक्रमात खा. पाटील यांच्या हस्ते रुद्राक्षाच्या वृक्षाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी या कार्यक्रमात आयएएस अधिकारी संकेत भोंडवे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम प्रशासक हरनाम सिंग, निवृत्त आयएएस अधिकारी जयराज फाटक, दिलीप बंड, हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माजी आमदार विलास लांडे पाटील, श्रीमती सुमन शांताराम भोंडवे आदींसह मुंबई, दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकारी, दावडी निमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी, श्रीकर परदेशी यांचा व्हिडीओ संदेश आणि पद्मश्री आण्णा हजारे यांचा लिखित संदेश प्रसारित करण्यात आला. तसेच उपस्थितांच्या हस्ते स्व. शांताराम भोंडवे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘हरित राजा’ या लघुपटाचे आणि “स्नेहबंध कौटुंबिक वात्सल्याचे” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: