Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री (दि.12) हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. संध्याकाळच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची प्रकृतीची विचारपूस केली असून डॉक्टरांशी, रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading