Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती – वसंत मोरे

मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिका घेतल्यावर पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षादेशांविरोधात भूमिका घेतली होती. यामध्ये त्यांमचे शराध्यक्ष पदही गेले. दरम्यान, या काळात त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असे वसंत मोरे यांनी आज ठाण्यातील सभेत बोलताना सांगितले.

काल वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले की, मी नाराज नाही मी मनसेतच राहणार व मी जे काही आहे ते उद्याच्या सभेतच बोलेन. त्याप्रमाणे वसंत मोरे यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेला संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले की, भाजपसहित सगळ्या राजकीय पक्षांची ऑफर मला आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.

वसंत मोरे म्हणाले ,राज ठाकरेंनी महाराष्ट्रात ब्लू प्रिंट आणली, ती प्रिंट आपण कुठपर्यंत पोहोचवली, पुण्यात दोन नगरसेवक आम्ही आहोत जर ती ब्लू प्रिंट असेल तर कात्रज आणि कोंडव्यात काय काय विकास केलाय ते दाखवतो, १०० नगरसेवक असताना काम होत नाही परंतु दोन नगरसेवक असताना जे काम करुन दाखवले आहे. भाजपचे पुणे मनपामध्ये १०० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४६ आणि शिवसेनेचे १० काँग्रेसचे नगरसेवक १० आणि मनसेचे २ नगरसेवक आहेत. तरिसुद्धा चर्चेतील नवीन चेहरा हा मनसेच्या नगरसेवकाला जातो म्हणजे आम्ही १०० टक्के काम केले आहे.

पुण्यात दोन नगरसेवक आहेत १६ वर्षांत आम्ही १६ उद्याने करणार आहोत. संपूर्ण पुणे शहरात १०० नगरसेवकांची सत्ता आहे परंतु मनसेच्या दोन नगरसेवकांची कामे जास्त होते. राज ठाकरेंनी ज्या गोष्टी मांडल्या त्या सगळ्या गोष्टी करताना चांगले काम करण्यास मिळाले. ज्या भूमिका राज ठाकरेंनी मांडल्या त्या विकासात्मक चेहरा म्हणून पुण्यात पुढे नेल्या आहेत. जिथे जिथे मनसेचे नगरसेवक काम करतात त्या सगळ्यांनी गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला काम करावे लागेल, असेही वसंत मोरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading