किरीट सोमय्यांंचे नाव देऊन पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी,शिवसेनेचे आंदोलन

पुणे:आयएनएस विक्रांत जहाजाच्या निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेऊन किरीट सोमय्यांंना या तथाकथित अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आज शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली , सोमैय्या असे नाव दिलेल्या एका पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी देऊन या अपहार प्रकरणी निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी शिवसैनिक उप विधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ युवासेना विधानसभा अधिकारी सनी गवते, रमेश शिरसागर सत्यजित कवडे, अक्षय फुलसुंदर, विभाग प्रमुख अनिल दामजी, राजेश मोरे, संतोष सोनवणे, राजेंद्र शहा, मकरंद केदारी, युवराज पारीख, नितीन नगडे, नंदु येवले, नितीन रावळेकर, अनंत घरत, सुशील पवार , विजय नायर, मयूर झेंडे, जितेंद्र जठार, मुरली विलकर, सचिन घोलप, सचिन खुडे, शंकर साठे, विजय पालवे, गजानन देशमुख, राहुल चिंदम, अतिश अनारसे, नितीन थोपटे, शुभम गायकवाड, मुकुंद लालबिगे, उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: