fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

शास्त्रीय गायनातून उलगडले राम भक्तीचे विविध पैलू

पुणे :  श्रीरामाचे नाम असे पुण्यधाम…श्रीरामाचे रूप मुग्ध करी मन…करता रूपाचे ध्यान शांती लाभे…हा प्रभू श्रीरामांचा अभंग, अहो नारायणा, सांभाळावे अपुल्या दीना, अमुची राखावा जा लाज, परोपरा हेचि काज  हा नारायणाची विनवणी करणारा अभंग आणि जानकी नाथ सहाय करें जब कौन बिगाड़ करे नर तेरो अशा भक्तीमय रचनेतून पं. रघुनंदन पणशीकर यांनी तुळशीबाग श्रीराम मंदिरात चैतन्यनिर्मिती केली आणि आपल्या गायनातून राम भक्तीचे विविध पैलू उलगडले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात पं.रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं.रघुनंदन पणशीकर यांनी यमन रागातील किशोरी आमोणकर यांची बंदिश तोसे नेहा लागा सावरो तन मन धन वारो हे गीत सादर केले. त्यानंतर आमुचा कैवारी हनुमान…पाठी असता तो जगजेठी वरकड काय गुमान हे हनुमान भक्ती वर्णन करणारे गीत सादर केले. तबला, सतार आणि टाळ यांच्या वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले.  बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर,होंठ में माया बिराजे…श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा…अवघा रंग एक झाला…. या भक्तीगीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading