fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

वृक्षदायी प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघा तर्फे आरोग्यदायी कडुनिंबाचे रोपण 

 

पिंपरी  : सण उत्सवाचा ही संकल्पना घेऊन वृक्षदायी प्रतिष्ठान, मराठवाडा जनविकास संघ व देहुगाव नगरपंचायत यांच्या वतीने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून ‘स्वच्छ देहू, हरित देहू उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती… या पंक्तीनुसार देहुगाव गायरान येथील जल शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी कडूलिंबाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी देहू नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका ज्योती टिळेकर, माजी सरपंच संतोष हगवणे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकोंबाचे 10 वे वंवशज शिवाजी महाराज मोरे, सचिन पवार, जगन्नाथ जरग, यश पवार, सतीश चव्हाण, सुभाष पाटील आदी मान्यवर उपास्थित होते. दरम्यान, अरुण पवार यांनी देहू आणि पंचक्रोशीमध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांना मराठवाडा जनविकास संघामार्फत मोफत पाणी पुरविण्यात येणार आहे, असे सांगितले.

शिवाजी महाराज मोरे यांनी सांगितले, की वृक्षदाई प्रतिष्ठानतर्फे सण  वृक्षांचा हे अभियान राबवण्यात येते. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडलेला आहे. प्रत्येक सणाला त्या संबधित वृक्षांची लावगड आणि संवर्धन करण्यात येते. गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading