तिरसाट सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या वेगवेगळे नवीन प्रयोग होताना दिसत आहेत. दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्या बरेच दिवस चर्चित असलेल्या “तिरसाट” फिल्मच्या पोस्टरचे दगडूशेठ मंदिर येथे नुकतेच अनावरण करण्यात आले. एक वेगळी कथा या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येत आहे..

चित्रपट निर्माते दिनेश किरवे यांच्या Class 1 फिल्मस या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. चित्रपटातील गाणी पी. शंकरम यांनी तर छायाचित्रण विकास सिंग यांनी केले आहे. या चित्रपटातून किशोर वयातील मुलांच्या भावविश्वाचे मांडणी करण वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे आणि चित्रपटाचे निर्माते दिनेश किरवे यांनी अनुभवलेली खऱ्या जीवनातील सत्य-कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात काही जुन्या कलाकारांसोबत नवीन अभिनेत्यांचे सुद्धा पदार्पण होत आहे आणि हे गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट निखळ मनोरंजनाबरोबरच समाजातील वास्तवाचे दर्शन करेल असा दृढ विश्वास निर्माते दिनेश किरवे तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: