मतदारांना Paytm द्वारे १००० रुपये वाटण्याचा प्रयत्न, ईडी चौकशीसाठी पत्र देणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :ऐन निवडणुकीमध्ये पैसे वाटप करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. कोल्हापूर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष सुरु आहे.

निवडणूक वैयक्तित पातळीवर नेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे. मुलांना घरोघरी पाठवून त्यांची माहिती गोळा कऱण्यात येत आहे. मोबाईल नंबर गोळा करुन नंतर त्यांच्या खात्यामध्ये पेटीएमद्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीत असा प्रकार होत असल्यामुळे ईडी चौकशी करण्यासाठी पत्र लिहिणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांना भुलवण्यासाठी पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका शिक्षण संस्थेचे तरुण-तरुणी घरोघरी फिरुन एक फॉर्म भरुन घेत आहेत. नाव, वय, फोन नंबर काय अशी माहिती गोळा करण्यात येत आहे. याची चौकशी निवडणूक आयोगाने केली पाहिजे. निवडणुकीच्या काळात असे काम कोणी दिले? त्यांना ऑफरसुद्धा दिली आहे की, चांगला डेटा जे गोळा करतील त्यांना इंटरनल मार्क जास्त देण्यात येणार आहेत. आता माझी पक्की माहिती आहे की, पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची ही पूर्वतयारी आहे.

नागरिकांना सावध करु इच्छितो की, मोदींनी भाषण करताना असे म्हटलं आहे की, भ्रष्टाचार करायचे कारवाई झाल्यानंतर आरडाओरडा करायचे हे मी चालू देणार नाही. त्यामुळे १ हजार रुपये प्रति माणसं खात्यात आल्यावरसुद्धा ईडी चौकशी करेल. हे पैसे आले कुठून आणि ज्याने पाठवले त्याला मिळाले कुठून, पेटीएमचा नंबर घेतल्याशिवाय पैसे पाठवता येत नाही. त्यामुळे ईडीला पत्र लिहिणार आहोत की, फार मोठा व्यवहार हे स्वतःचा काळा पैसा मतदारांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होणार आहे. लोकांना आवाहन करतो की, नको ते शुक्लकाष्ट मागे लावून घेऊ नका असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दोन दिवसांपुर्वी शहरातील दारु दुकानदारांची बैठक घेऊन सगळ्यांना दम दिला आहे. त्यांना सांगितले की, वरुन दबाव आहे. तुम्ही आमची मजबुरी समजून घ्या आणि तुम्ही काँग्रेसला मतदान केले पाहिजे. निवडणूक असताना हे आम्ही समजून घेणार नाही. भाजप महाराष्ट्रात १०६ विधानसभा आणि २७ विधान परिषद आमदार, २३ लोकसभा आणि १० राज्यसभा सदस्य असणारा पक्ष आहे. जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना घेराव घालू त्यांनी दमबाजी थांबवली पाहिजे. सरकारी कर्मचारी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना सांगणार, हे सगळ पराभवाच्या भीतीने चालले आहे. वेगळ्या संस्थांच्या मागे लागले आहेत की, पाठिंब्याचे पत्र काढा, चांगल्या पद्धतीने निवडणूक लढा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: