पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हांडा मोर्चा
पुणे : आपल्या पुणे शहरातील गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट,आंबेडकरनगर, प्रेमनगर तसेच पर्वती मतदार संघातील वसाहत व सोसायटी भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याविरोधात नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार अर्ज आणि तोंडी विनंती त्याचबरोबर आंदोलन करून देखील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष नागरे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभाग स्वारगेट येथे ‘हंडा मोर्चा’ काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विविध पदाधिकाऱ्यांच्या समवेत सहभागी झालो.
दैनंदिन जीवन जगत असताना पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पुणे मनपा प्रशासनाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे परिसरातील महिलांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं आजच्या या आंदोलनात परिसरातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
यावेळी स्वारगेट पाणी पुरवठा विभागाचे जे.ई. मिसाळ यांनी सदर प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले त्याच बरोबर अभियंता अशीच जाधव यांनीदेखील सदर प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी, बाळासाहेब अटल, शशिकांत तापकीर, माजी नगरसेविका प्रियाताई गदादे, सौ. शशिकलाताई कुंभार, संजय दामोदरे, श्वेताताई होनराव, अमोल ननावरे, बापू तळेकर, मोहसिन काझी, दिलीप अरूंदेकर, प्राजक्ता जाधव, गणेश दामोदरे, रामदास गाडे, मिलिंद कडभाणे, राहुल गुंड, प्रशांत साष्टे, सुमित्रा कांबळे, सागर नांगरे, दिपक जाधव, मंगेश मेंगडे, रवी कोतले, रवींद्र शिर्के, सौ. विद्याताई ताकवले, .सोनालीताई उजागरे, रजिया काझी, योगेश पवार, अर्जुन धसाडे, सतीश वाघमारे, संकेत शिंदे, मंथन जागडे, विनय पाटील, राजू राऊत, दत्ता बनगर, अर्जुन गंजे, तेजस मिसाळ, प्रशांत कदम, रुपालीताई कदम, .रुपालीताई बिबवे, हेमंत गायकवाड, ॲड. गालिंदे आदी उपस्थित होते.