हसन मुश्रीफ कुटुंबीयांचा १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार – किरीट सोमय्या

पुणे : हसन मुश्रीफ कुटुंबीयांनी सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. हा पैसा ४७ कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच मुश्रीफ कुटुंबीयांकडे शेल कंपन्यांतून हा पैसा आला आहे. हा पैसा भ्रष्टाचारातून आलेला आहे. ठाकरे सरकारने त्याची चौकशी अद्याप का केलेली नाही? असा सवाल देखील सोमय्यांनी यावेळी उपस्थित केला.

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार हसन मुश्रिफांवर कारवाई करणार नाही. त्यामुळे आयकर विभागाला तक्रार दिली. मुश्रिफांच्या बेनामी संपत्तीची सर्व माहिती आयकर विभागाला दिली. मुश्रीफ कुटुंबीयांकडे ४७ कंपन्यांकडून पैसे आलेत. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी १०० कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला? याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. हसन मुश्रीफांची बेनामी संपत्त करा, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.

भारत सरकारने मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने स्वतः याचिका दाखल केली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात देखील दाखल केली. आता हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी, बेनामी कायदा, आय़कर विभाग, मनी लाँडरींग याअंतर्गत कारवाई सुरू झाली आहे. असंही सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांवर ठाकरे-पवार सरकार कारवाई करणार नाही. कारण, दोन्ही कुटुंब घोटाळेबाज आहेत. मुश्रीफांवर कारवाई केली तर आदित्य ठाकरेंवर कारवाई करावी लागेल. त्यानंतर अजित पवारांवर कारवाई करावी लागेल. त्यामुळे एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाला वाचवत आहे, असा आरोप देखील मुश्रीफांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: