Tuesday, October 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Nanded crime : तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

नांदेड : नांदेडकडून मुंबईकडे निघालेल्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास घेवून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एकाच खळबळ उडाली. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. यत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. या गाडीच्या एक डब्यातील शौचालयाच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला मोठ्या रुमालाने अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना रेल्वे प्रशासनाने कळवली. त्यानंतर उनवणे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार या घटनास्थळी दाखल झाल्या. सदर मृतदेह रेल्वेच्या खिडकीवरून खाली उतरवून पंचनामा करून तपासणी करण्यात आली. सदर इसमाच्या खिशात ओळख पटवणारे काहीही पुरावे सापडले नाहीत. मात्र तो 25 वर्षे वयाचा असावा, असा अंदाज आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading