यशस्वी होण्यासाठी परिश्रम, सातत्य आणि प्रयत्नांची त्रिसुत्री महत्वाची – डॉ. अ.ल.देशमुख 

पुणे : अनेक विद्यार्थांना वाटते की यशस्वी होण्यासाठी चांगली बुद्धिमत्ता असणे गरजेचे आहे. परंतु बुद्धिमत्ता ही सर्वांची सारखीच असते, फक्त त्याचा वापर तुम्हाला योग्यरित्या करता आला पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी सातत्य, परिश्रम आणि प्रयत्नांची त्रिसुत्री महत्वाची आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केले.

विद्या महामंडळ संस्थेच्या आपटे ज्युनियर कॉलेजच्या ११वी सायन्स, कॉमर्स आणि शारदा विद्या मंदिर- प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पूना कॉस्मोपॉलिटीन लेडीज सर्कल ८१ च्यावतीने संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी सर्कलच्या चेअरपर्सन अनुपमा जैन, सेक्रेटरी श्रृती मुंदडा, एरिया चेअरपर्सन निशरीन काचवाला, नेहा सेठिया, रीटा मुथा, शीला कोठारी, जया लुंकड, रेणू पलरेशा, संस्थेचे कार्यवाह गीता देडगावकर, कोषाध्यक्ष अपर्णा कुलकर्णी, मेधा सिन्नरकर आदी उपस्थित होते. एकूण २० विद्यार्थ्यांना रुपये ६५,०००/- ची शिष्यवृत्ती देण्यात आली.

निशरीन काचवाला म्हणाल्या, आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया हा शिक्षणावर अवलंबून असतो. तुम्ही जे शालेय जीवनात शिकता ते तुम्ही तुमच्या मुलांना देखील शिकवता. म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे. शिक्षणावर पुढील पिढीचे भवितव्य अवलंबून असते. यावेळी विद्यार्थी व पालकांनी देखील मनोगत व्यक्त करीत संस्थेचे आभार मानले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: