Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” अंकुश काकडे यांचा सवाल

पुणे:पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे. काल त्यांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीश बापट यांचा वर केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading