‘द आर्ट आॅफ महाविरा’ राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा पुण्यात

पुणे : जैन सोशल ग्रुप युथ पुणे सेंट्रल यांच्यावतीने आणि नवकार आर्ट फाउंडेशन यांच्या सहयोगाने ‘द आर्ट आॅफ महाविरा ‘ या भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. महावीर जन्म कल्याणक (जयंती) च्या निमित्ताने आजच्या पिढीला भगवान महावीर यांचे मौलिक विचार कळावेत, या हेतूने चित्रकला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जैन सोशल ग्रुप युथ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष प्रितम भटेवरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक धीरज ओस्तवाल, नीलमकुमार भंडारी, रजिस्ट्रेशन आनंद चोरडिया, संयोजन पवन भंडारी यांनी केले आहे. तसेच प्रदर्शनाची जबाबदारी नवकार आर्ट फाउंडेशन तर्फे मनसुख छाजेड, प्रेरणा ओस्तवाल यांनी घेतली आहे.

दिनांक १४ एप्रिल रोजी बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावरील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. तब्बल एक लाख रुपयांपेक्षा जास्त रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. वयवर्षे ७ ते १२ व १२ वर्षांवरील विद्यार्थी, छंद जोपासणारे कलाकार, व्यावसायिक कलाकार या तीन विभागात स्पर्धा होणार आहे.

भगवान महावीर यांनी दिलेली शिकवण स्पर्धकांनी चित्राद्वारे मांडावी, ही स्पधेर्मागील संकल्पना आहे. यामध्ये जिओ और जिने दो, अहिंसा परमो धर्म, सन्मार्ग पर चलने की प्रेरणा, सत्य अहिंसा त्याग, शुभ विचार धारा, शमा भाव, प्रेम और परोपकार आदी विचार चित्रांद्वारे मांडण्यात येणार आहेत. पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर अशा विविध भागांतून स्पर्धक सहभागी होणार आहेत.

प्रख्यात चित्रकार मुरली लाहोटी, सुरेश लोणकर, प्रमोद कांबळे, शंकर गोजरे, सुनील हंबीर आदी कलाकार देखील आपली कला यामध्ये सादर करणार आहेत. निवडक चित्रांचे प्रदर्शन देखील दिनांक १६ व १७ एप्रिल रोजी सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठी आर्ट गॅलरी येथे होणार आहे. तसेच येथेच दिनांक १७ एप्रिल रोजी होणा-या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून किरण बेदी उपस्थित राहणार आहेत. तरी स्पर्धकांनी http://www.jsgypc.org या संकेतस्थळावर किंवा मो. ९२२६३७२२९३, ९६०७७७७११० या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभाग व माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: