उद्यापासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत, त्यामुळे शिवसेनेला कोणी आव्हान देऊ नये – वरूण सरदेसाई

पुणे : नारायण राणे हे शिवसेनेला कोकणात येऊन दाखवावे, असे सारखे आव्हान करत असतात.  त्यावर आम्ही जे काही काम करतो ते जनतेसमोर ठेवतो आणि त्यामुळेच आम्ही निवडून येतो. उद्यापासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणीही आव्हान देऊ नये, असा इशारा युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.

वरूण सरदेसाई आज हे पुणे दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, युवासेनेच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात आज पासून करत आहोत. राज्यभर हा दौरा होणार असून विद्यापीठात होणाऱ्या सिनेट निवडणूका लक्षात ठेवून हा दौरा आयोजित केला आहे. शिवसेनेचं शिव संपर्क अभियान तसेच युवासेना देखील राज्यभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे. युवासेना ही गावं पातळीवर पोहोचली पाहिजे हा मानस आहे. राज्याच्या प्रत्येक  विद्यापीठात मुंबई सारखं कमाल करवून दाखवणार, असे वरूण सरदेसाई म्हणाले.

किरीट सोमाय्या यांच्या कालच्या दापोली येथील राजकीय नाट्यावर भाष्य करताना वरूण सरदेसाई म्हणाले, सामान्य जनतेला यात रस नाही. महागाई कधी कमी होणार याची नागरिकांना चिंता आहे.
बेरोजगारी आणि दरवाढ असे प्रश्न असताना मुद्दाम लोकांचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या करत आहेत.

वाढत्या महागाईवर बोलताना सरदेसाई म्हणाले, भाजपची केंद्रात एक हाती सत्ता तरी देखील देशात रोजगार नाहीत. आम्ही या संपर्क अभियानातून लोकांचा हा आक्रोश केंद्रापर्यंत पोहोचवणार आहोत.

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी एका पीडित मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर ते म्हणाले, नेते आणि पक्ष याबाबत योग्य निर्णय घेतील.

महानगरपालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणामुळे पुढे गेल्या आहेत. त्यावर देसाई म्हणाले, निवडणुका या एप्रिल-मे महिन्यामध्ये होतील असं वाटत होतं पण त्यानंतर जो काही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे निवडणुका पुढे जातील असे दिसत आहे. मात्र, शिवसेना आधीपासून सगळ्या निवडणुकांसाठी तयार होती.आता जो काही वेळ वाढवून मिळाला आहेत त्यामध्ये आम्ही संघटनात्मक बांधणी करणार आहोत. त्यासोबतच या काळामध्ये जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना ॲक्टिव मोडवर टाकला आहे. असे वरूण सरदेसाई म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: