संतोष बांगरचा वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने जोडे मारून जाहीर निषेध

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, महासचिव निलेश वामने, उपाध्यक्ष हिरामण वाघमारे, संतोष लोंढे, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, महिला आघाडी पुणे जिल्हा सचिव प्रशांती साळवे, पेरणे ग्रामपंचायत सरपंच बाबू लोंढ, ग्रामपंचायत सदस्य मंगल वामने, हवेली ता.अध्यक्ष संजय साळवे, शंकर मलके, अप्पा साळवे, अशोक सकट, भिका साठे, मंगल चव्हाण, मीना लोंढे, राम फासगे, सुनील वाघमारे, बबन वाघमारे, दत्ता लोंढे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: