किर्लोस्कर ब्रदर्स लि. ने किसान मेळाव्यात प्रदर्शित केले न्यु जनरेशन एनर्जी एफिशियंट पंप  

मोशी (पिंपरी) : येथे भरविण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या किसान कृषी प्रदर्शनात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल)ने शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी न्यु जनरेशन एनर्जी एफिशियंट पंपांची सीरिज सादर केली आहे. याची घोषणा किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या सह-व्यवस्थापकीय संचालिका रमा किर्लोस्कर यांनी केली. दरम्यान, या अत्याधुनिक पंपाबद्दल शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
याबाबत बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या सह-व्यवस्थापकीय संचालिका रमा किर्लोस्कर म्हणाल्या, की केबीएलचे नुकतेच लॉन्च केलेले न्यु जनरेशन पंप अनेक प्रकारे कार्यक्षम आहेत. हे पंप शेतातील खुप खोल अशा बोअरवेलमधून पाणी काढण्यास सक्षम आहेत, जेणेकरून पाण्याची पातळी एका विशिष्ट पातळीच्या खाली घसरली तरीही शेतकरी हे पंप वापरू शकतात जरी. या वैशिष्ट्यामुळे नव्या किर्लोस्कर पंपांचा वापर सिंचनासारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो. जेथे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सामान्य पंपांना मर्यादा आहेत.
 पंप बनवताना आम्ही नेहमीच शेतकर्‍यांचा फायदा लक्षात घेतला आहे. नवीन पिढीतील हे पंप प्रगत तंत्रज्ञानाने तयार केले जातात. न्यु जनरेशन पंपांची रचना अशा प्रकारे केली आहे. ज्यामुळे हे पंप कमी उर्जेत उच्च कामगिरीस सक्षम आहेत. आम्ही पुर्वीपासूनच एनर्जी एफिशिएंट पंपांचे उत्पादन करून शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी मदत करत आहोत आणि भविष्यातही करत राहु,  प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेले हे पंप उच्च कार्यक्षमा देतात व कमी ऊर्जा वापरतात. त्यामुळे, किर्लोस्करचे नवीन जनरेशन पंप सिंचनासाठी वापरले तर शेतकर्यांचे विजेचे बिल कमी होईल व त्यांचे बरेच पैसे वाचतील. इतर उत्पादकांच्या पंपांच्या तुलनेत किर्लोस्कर पंप दीर्घकालिन कार्यक्षम आहे ज्यामुळे कार्यक्षमतेत कोणतीही हानी होत नाही.बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सामान्य पंपांच्या तुलनेत किर्लोस्कर पंपांमध्ये ऊर्जेची बचत करण्याची आणि शेतकर्यांचे वीज बिल 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची क्षमता आहे.
 सिंचनासाठी योग्य पंप निवडल्याने एकूणच शेतकर्यांच्या समृद्धीला हातभार लागतो. त्यामुळे शेतकरी, न्यु जनरेशन किर्लोस्कर पंपांवर अवलंबून राहू शकतात जे ऊर्जा-कार्यक्षम आहेत, आणि मोटार जळण्याची शक्यता कमी आहे . किर्लोस्कर पंपांनी एका शतकाहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आणि वापरकर्त्यांमध्ये ते पसंतीचे पर्याय बनले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: