Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर
बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मुलीशी मैत्री करून नंतर शारीरिक संबंध ठेवल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. तसेच अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही या मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान प्रथमेश मारणे याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आरोपी हा फिर्यादीच्या कॉमन मित्रांपैकीच होता. आरोपीने या मुलीबरोबर ओळख वाढवून तिला खडकवासला धरण येथे फिरायला घेऊन गेला. येताना एका हॉटेलवर थांबवून तीच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुणे-बंगळूर हायवेवरील राजगड हॉटेल, मुळशी अशा ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. असा आरोप या मुलीने प्रथमेश मारणे याच्यावर ठेवला आहे
हे सर्व करताना विशेष म्हणजे चोरून अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली. फिर्यादीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तिला धमक्या दिल्या. काय करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम 376, 504, 506 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे कलम 66 (E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading