‘गलीबॉय’ फेम रॅपर एम. सी तोड फोड याची अकाली ‘एक्झिट’; रणवीर सिंग, झोया अख्तर यांच्याकडून शोक व्यक्त  

मुंबई : ‘गलीबॉय’ फेम रॅपर धर्मेश परमार अर्थात एम. सी तोड फोड याचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तवावर भाष्य आणि गुजराती गीतांसाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय मुंबई स्ट्रीट रॅपर ही त्यांची मूळ ओळख. त्याच्या अकाली एक्झिटमुळे बॉलीवूड मधील अभिनेता रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, दिग्दर्शक झोया अख्तर आदींनी शोक व्यक्त केला आहे.

एम. सी तोड फोड हा मुंबईच्या ‘स्वदेशी’ बहुभाषिक हिप-हॉप ग्रुपचा एक भाग होता. एम. सी तोड फोड हा झोया अख्तरच्या ‘गलीबॉय’ चित्रपटात योगदान देणाऱ्या रॅपर पैकी तो एक होता. आझादी रेकॉर्डचे सह-संस्थापक उदय कपूर यांनी दिलेल्या माहिती नुसार, नाशिकजवळील एका ठिकाणी तो त्याच्या स्वदेशी क्रू मेंबर्ससोबत फुटबॉल खेळत असताना तो कोसळला. त्यामुळे मृत्यूचे कारण आधीपासून अस्तित्वात असलेल्या हृदयविकाराचा परिणाम असावा असे वाटते.

अभिनेता रणवीर सिंग याने तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह रॅपरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तर सिद्धांतने दिवंगत रॅपरशी केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये ते एकमेकांच्या कामगिरीचे अभिनंदन करतात. “आरआयपी भाई,” असे त्याने लिहिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: