Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

जुन्नर: राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वत: आज शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व महाअभिषेक घातला.

यावेळी अमित ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेचे आमदार राजू पाटील, बाप्पू वासगावकर, व मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी आम्ही ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला अमित ठाकरे म्हणाले, की.हा माझा राजकीय दौरा नाही. फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय. सगळ्यात शिवभक्तांनी शिवजयंती साजरी करावी असे अमित ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading