Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 12 कोरोना रुग्णांची नोंद 

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 12 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज पुणे शहरात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही.

पुणे शहरात आजपर्यंत एकूण कोरोना रुग्ण संख्या 6 लाख 61 हजार 737 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 112 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1278 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading