आज दिवसभरात पुणे शहरात  नवीन 12 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 12 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज पुणे शहरात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तर 41 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंतची कोरोना रुग्ण संख्या ही 6 लाख 61 हजार 697 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 132 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 217 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2099 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: