सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांवर सुड उगवणाऱ्या आसुरी शक्तींची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे होळी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा ई व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा, १४ लाखांचे झाड, ॲमिनिटी स्पेस विक्री घोटाळा, ३२०० फ्लॅट विक्री घोटाळा, जलपर्णी घोटाळा, कॉफिटेबल बुक घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली.

“नोटबंदीची घोषणा करुन जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे महाराजा”, “सरकारी कंपन्या विकून जनतेचा रोजगार हिसकाविणाऱ्यांना शिक्षा दे रे महाराजा”, “जाती-धर्मात तेढ वाढवून राजकारण करणाऱ्यांना चोप दे रे महाराजा”, “सत्तेच्या धुंदीत बेताल वागणाऱ्यांना ताळ्यावर आण रे महाराजा “, “पेट्रोल-डिझेल-गॅस महाग करणाऱ्यांना बुद्धी दे महाराजा”, “शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे ठोकणाऱ्यांना अक्कल दे रे महाराजा” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की “आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो व महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात कारभारी करणारी करणारी भाजप असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही ,अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अनिष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,निलेश वरे,रोहन पायगुडे,संजय गाडे,सुशांत साबळे,चंद्रशेखर धावडे,डॉ.सुनिता मोरे,सारिका पारेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: