‘तुकाराम बीज’निमित्त देहूगावसाठी जादा बसेस

पुणे : येत्या रविवार (दि. २०) ‘तुकाराम बीज’ असून या दिवशी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या  दर्शनासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहूगाव येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील जास्त असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही परिवहन महामंडळामार्फत जादा बसेसची व्यवस्था नेहमीच्या तिकीट दराने करण्यात येणार आहे. ही जादा बसेसची व्यवस्था दि. १९ ते दि. २१ मार्च या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे.

देहूगाव व आळंदी साठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेल्या स्थानकांची/ठिकाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

बसमार्गाचे नाव – स्थानकाचे नाव
स्वारगेट ते देहूगाव – स्वारगेट व देहूगाव स्थानक
मनपा भवन ते देहूगाव – मनपा भवन व देहूगाव स्थानक
मनपा भवन ते आळंदी – मनपा भवन व आळंदी स्थानक
देहूगाव ते आळंदी – देहूगाव व आळंदी स्थानक
स्वारगेट ते आळंदी – स्वारगेट व आळंदी स्थानक
पुणे स्टेशन ते देहूगाव – पुणे स्टेशन डेपो व देहूगाव स्थानक
निगडी ते देहूगाव – निगडी व देहूगाव स्थानक

देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील परंडवाल चौक दर्ग्याजवळील कुणाल बिरदवडे
यांच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. सदर ठिकाणाहून वरील जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच देहूगाव येथून आळंदीला जाण्यासाठी देहूगाव-आळंदी रस्त्यावर विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळील मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.

 

Leave a Reply

%d bloggers like this: