भाजपने केली महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी

पुणे: भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभारा विरुद्ध होळी साजरी करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष व  आमदार चंद्रकांत पाटील यांनी या होळीचे दहन केले. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक गणेश घोष स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या होळीच्या वेळी महा विकास आघाडी सरकारने  केलेल्या वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.
या होळी चे नेतृत्व भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले होते. ही होळी भाजप पुणे शहर कार्यालयाच्या येथे करण्यात आली.

जगदीश मुळीक म्हणाले,सगळ्या वाईट प्रवृत्ती जाळण्याच प्रतीक म्हणजे होळी आहे. हे सरकार सामान्य माणसावर अन्याय करत आहे.या सरकारला आमदाराचा निधी वाढवण्यासाठी, त्यांच्या ड्रायव्हर चा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत . यामुळे आम्ही या सरकारचा त्या होळीतून निषेध करत आहोत. या सरकारला महिलांवरील अत्याचार कसे सोडा वावे नयाची जागा घ्यावी. एसटी कामगारांचे विलीनीकरण करून त्यांचे लवकरात लवकर प्रश्न सोडवावेत म्हणून आज आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी साजरी करत आहोत असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: