Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरण : डॉ. सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्यशासाना कडूनच 

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. तसेच त्यांची पदस्थापना ही राज्यशासाना कडूनच करण्यात आली आहे. यामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले.

या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त प्रसारीत करण्यात आले होते. त्यावर आज राजभवनतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. सुनील पोखरणा यांनी दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरून  राज्यपाल महोदयांकडे दाद मागितली होती.

या संदर्भात राज्यपाल महोदयांनी दि. १६ मार्चला राजभवन येथे सुनावणी ठेवली होती. तसेच  या सुनावणीसाठी अर्जदार डॉ. सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन दि. १५ मार्चलाच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरूर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले.

राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची  पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

फोटो – संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading