रोश डायबिटीस केअरतर्फे स्वीटलिंग्सच्या साथीने उपचारांची शाश्वत उपलब्धता

पुणे: रोश डायबिटीस केअर इंडिया (आरडीसी इंडिया) ने हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वीटलिंग्स) सोबत सहकार्य केले आहे. या सहकार्यातून टाइप १ डायबिटीस (टी१डी) असलेल्या मुलांना परिपूर्ण वैद्यकीय उपचार आणि थेरपीमध्ये आवश्यक साह्य पुरवले जाणार आहे. भारतभरातील मधुमेही रुग्णांना शाश्वत पद्धतीने उपचार पुरवण्याच्या आरडीसीच्या बांधिलकीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सध्या, भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रौढ मधुमेही रुग्ण असलेले राष्ट्र आहेच. शिवाय, भारतातील जवळपास ५७ टक्के लोकांचे निदानच होत नाही. जवळपास १ लाख लोकसंख्येसह, टाईप १ डायबिटीस असणाऱ्या मुलांची आणि किशोरवयीन मुलांची (० ते १४ वर्षे) संख्याही सुमारे १ लाख असल्याने भारत याबाबतीत पहिल्या १० देशांमध्ये आहे. या आकडेवारीमुळे या आजाराबद्दलची जागरुकता, आधीच्या टप्प्यातील निदान आणि चाचण्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवून थेरपीतील सातत्य जपणे याबद्दलची तातडीची गरज अधोरेखित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना आरडीसीचे भारत मध्य पूर्व आणि आफ्रिका या भागाचे क्लस्टर हेड ओमार शरीफ मोहम्मद म्हणाले, “उपचार उपलब्ध असणे याचा अर्थ फक्त वैद्यकीय उपचार पुरवण्याइतका मर्यादित नाही तर त्या पलिकडे जात योग्य वेळेत निदान होणे आणि उपचार सुरू होण्यासाठीची परिसंस्था उभारण्यासोबतच उपचारांमधील सातत्य जपण्यासाठी आवश्यक सामाजिक-आर्थिक पाठबळ पुरवण्याचाही समावेश आहे. जागरुकतेअभावी जे पूर्वग्रह निर्माण होतात त्यामुळे बऱ्याचदा उपचार उपलब्ध होण्यावर परिणाम होत असतो. लक्षणीय स्वरुपात बदल घडवायचा असेल तर आपल्याला आधी हे अडथळे दूर करायला हवेत.”

“स्वीटलिंग्समध्ये आम्हाला असा भागीदार सापडला आहे जे आमच्याप्रमाणेच या उद्दिष्टाला बांधिल आहेत. आरोग्याचे आर्थिक परिणाम जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित संशोधन हाती घेणे शक्य होईल अशी एक शाश्वत पद्धत एकमेकांच्या साथीने या भागीदारीतून आम्ही निर्माण करू, अशी आशा आहे. यामुळे देशातील मधुमेहाचे गांभीर्य आणि त्यावरील उपचार मिळण्यातील अडथळे अधोरेखित करण्यात मोठी मदत होईल.”

एचसीजेएमआरआयच्या उप संचालक डॉ. अनुराधा खाडिलकर म्हणाल्या, “रोश डायबिटीस केअर सोबतच्या सहकार्यामुळे आम्हाला टी१डी असलेल्या अधिकाधिक मुलांपर्यंत हा परिपूर्ण कार्यक्रम नेणे शक्य होईल. त्यामुळे या मुलांना अधिक आनंदी आणि उत्साही आयुष्य जगता येईल. .”

Leave a Reply

%d bloggers like this: