एसएमईएफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थ्यांतर्फे मार्केटयार्ड प्रेमनगर वसाहतीचे  नूतनीकरण

पुणे : मार्केटयार्डमधील प्रेमनगर वसाहतीमधील पार्किंगसाठी वापरण्यात येणारी ७,००० चौरस फूट रस्त्यावरील जागेचे   एसएमईएफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थ्यांतर्फे नूतनीकरण तसेच रंगीत परिवर्तन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग म्हणून सामाजिक उपक्रम कार्यशाळेची संकल्पना केली होती. ज्याचा मूळ उद्देश सुरक्षित, सर्वसमावेशक सार्वजनिक जागा म्हणून लोकांना हक्काने जागा देणे हा आहे.

शहरी सुधारणा हा कार्यशाळेचा उद्देश असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या आणि कमी किमतीच्या डिझाइन सोल्यूशन्सचा संदर्भ देण्यात आला. विद्यार्थी आणि स्थानिकांच्या सहभागाने वसाहतीतील जागा चमकदार रंग, विविध डिसाईन आणि मुलांसाठी खेळांनी रंगविण्यात आली.एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे आणि पुणे महापालिकेच्या पाठिंब्याने हा  उपक्रमाला राबविण्यात आला आहे.

स्टुडिओ इन्फिलचे आर्किटेक्ट मेघना पटेल आणि आर्किटेक्ट रोहित गाडीया यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या कल्पनेची अंमलबजावणी एसएमईएफच्या ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केली. एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या संस्थापक-संचालक पूजा मिसाळ, बीएसओएच्या प्राचार्य डॉ. पूर्वा केसकर, एसएमईएफच्याच्या ब्रिक स्कूल ऑफ इंटिरियर डिझाइनचे विभाग प्रमुख आर्किटेक्ट मनाली देखमुख, शैक्षणिक समन्वयक आर्किटेक्ट   मयुरेश शिरोळकर, व्यावसायिक समन्वयक भाग्यश्री बांदेकर, निनाद रेवतकर आणि सुधीर देशपांडे आणि विद्यार्थी समन्वयक श्रुती खंडेलवाल, अथर्व शिंदे, पार्थ साबल आणि अथर्व वंजारी यांनी त्यासाठी मदत केली.

बदललेली जागा १० मार्चपासून खेळ, संगीत आणि नृत्य अशा उत्सवी कार्यक्रमासह लोकांसाठी खुली करण्यात आली. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला आणि वसाहतीमधील १२५ हून अधिक मुलांनी आनंदीपणे त्यात सहभाग घेतला. जलद, कमी किमतीत होणारे परिवर्तन सर्वाना भावले असून  सर्व वयोगटासाठी हे खुले राहणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: