‘ओला एस वन प्रो’ – “गेरुआ” रंगातील स्पेशल एडिशन सादर

बंगळूर : ओला इलेक्ट्रिक ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन (ईव्हीएस) उत्पादक यंदा होळीच्या दिवशी आपल्या क्रांतीकारी ओला एस वन प्रो (Ola S1 Pro) साठी आपली पुढील खरेदीची संधी खुली करून देणार आहे. या निमित्ताने ओला एक खास स्पेशल एडिशन सादर करत आहे, जी अनोख्या ‘गेरुआ’ या रंगातील एका सुंदर ग्लॉसी फिनिशमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा रंग फक्त १७ आणि १८ मार्च या होळीच्या दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.

या वाहनासाठी आधी पासून आरक्षण केलेले सर्व ग्राहक १७ तारखेला खरेदीसाठी खुल्या करण्यात येणाऱ्या विशेष जलद खरेदीसाठी पात्र असतीलतर इतर सर्व ग्राहक १८ मार्च रोजी खरेदी करू शकणार आहेत. हा अनोखा गेरुआ रंग फक्त १७ आणि १८ तारखेलाच खरेदी करता येणार आहे आणि नंतर पुन्हा उपलब्ध होणार नाही. एस वन प्रो मध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या इतर १० सुंदर आकर्षक रंगांपैकी कोणतेही रंग ग्राहक नंतर खरेदी करू शकणार आहेत.

पूर्वीप्रमाणेचया खरेदीसाठीची संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रक्रिया केवळ ओला अॅपद्वारेच होईल. ओला फ्युचर फॅक्टरीमधून ओला एस वन प्रो च्या या नवीन ऑर्डर्सचा पुरवठा (डिस्पॅच) एप्रिल २०२२ पासून सुरू होणार असून गाडी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवली जाईल.

एस वन प्रो मध्ये उत्कृष्ट रचनाउत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा समावेश असून ही इलेक्ट्रिक वाहने देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या स्कूटर्सची निर्मिती ओला फ्युचर फॅक्टरी मध्ये केली जात असून हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत दुचाकी निर्मिती कारखाना आहे. ग्राहकांची प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सध्या ओला एस वन प्रो स्कूटरचे उत्पादन आणि वितरण वाढवत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: