fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsSports

पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग 2022 स्पर्धेत मस्किटर्स संघाला विजेतेपद

 पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत चुरशीच्या सामन्यात मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 13टाय विजयी विरुद्ध 10टाय(574-510) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
 
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिसटेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अतितटीच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 13टाय विजयी विरुद्ध 10टाय(574-510) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात टेबल टेनिस प्रकारात संजय बामणे, वैशाली सोहोनी, नितीन पेंडसे, अतुल ठोंबरे, शैलेश लिमये, आदित्य पावनगडकर, सार्थक प्रधान, रोहन दळवी, आदित्य गांधी, संदीप साठे, अभिजीत शहा, प्रियदर्शन डुंबरे यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 6टाय विजयी विरुद्ध 2टाय(232-171) असा पराभव करून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टेनिसमध्ये पराग चोपडा, रोहन दळवी, रोनित मुथा, प्रियदर्शन डुंबरे, शैलेश लिमये, अर्णव काळे, अभिजीत शहा, चिन्मय दांडेकर, वेद मोघे, समीर सावळा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 5टाय विजयी विरुद्ध 2टाय (181-136) असा पराभव करून आपली आघाडी अधिक भक्कम केली. 
 
फक्त एक लढतीच्या विजयाच्या शोधात असलेल्या मस्किटर्स संघाला तलवार्स संघाने बॅडमिंटन प्रकारात कडवी झुंज दिली. यामध्ये तलवार्सच्या  आर्य देवधर, मकरंद चितळे, मिहीर आपटे, अविनाश दोशी, ईशान भाले, प्रशांत वैद्य, गिरीश मुजुमदार, अक्षय ओक, राहुल पाठक, वेदांत खटोड यांनी अफलातून कामगिरी करत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पण सातव्या लढतीत मस्किटर्सच्या अतुल ठोंबरे व सार्थक प्रधान या जोडीने तलवार्सच्या रोहन जमेनिस व शरयू राव यांचा 30-23 असा पराभव करून संघाचा 2टाय विरुद्ध 6टाय(161-203) अशा फरकाने विजय सुकर केला. 
  
स्पर्धेतील विजेत्या मस्किटर्स संघाला करंडक व पदके अशी आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, तन्मय आगाशे आणि रिबाऊंड स्पोर्ट्सचे संचालक व स्पर्धेचे प्रायोजक आलोक तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेन्द्र चितळे, सिद्धार्थ निवसरकर, मनीष चौबळ, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अभिषेक ताम्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading