जय आनंद ग्रुप तर्फे प्रकाश धारिवाल यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

पुणे: जय आनंद ग्रुप तर्फे 1997 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी माणिकचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जय आनंद ग्रुपचे नवलाखा दगडू लालजी, बोरा मोहन लाल उपस्थित होते. 

विजय चोरडिया म्हणाले, जय आनंद ग्रुप ही संघटना पुण्यात सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करीत आहे.प पु उपाध्यक्ष प्रवर श्री प्रवीण ऋषीजी म.सा यांच्या प्रेरणेने 1994 सालापासून ही संघटना कार्यरत आहे. मोफत आरोग्य शिबिरे मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप रक्तदान शिबिर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप. अंध अपंग निरश्रित लोकांच्या आश्रमांना धान्य व इतर मदत , सुमारे शंभर कुटुंबांना दीपावली फराळ साहित्य वाटप असे विविध प्रकारचे कार्य संघटने कडून केले जाते. पुणे महानगरपालिका आणि राज्य पाटबंधारे खाते यांच्या मदतीने संघटनेने हडपसर पुणे येथे ऋषी आनंदवनची उभारणी केली आहे. तिथे तीर्थकर विहार नक्षत्रवन आणि ध्यान केंद्र जॉगिंग ट्रॅक साकारले आहे. तसेच सामाजिक कामात आपल्या क्षमतेप्रमाणे योगदान देत आहे.

आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉक्टर के ए स संचेती , माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड जयकांत कोठारी शांतीलाल मुथा माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी दुपारी चार वाजता महावीर प्रतिष्ठान सेलिब्रेट पार्क पुणे येथे शासकीय नियमाच्या अधीन राहून होणाऱ्या या समारंभात सर्वांनी उपस्थित राहावे .असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: