‘इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’ मध्ये बहारदार नृत्य सादरीकरण

पुणे: ‘संस्कृतिकी’ आयोजित दोन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हलमध्ये बहारदार नृत्यप्रकारांचे सादरीकरण झाले,त्यांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले.

नृत्यगुरु मनिषा साठे यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. ओडिसी नृत्यांगना शीतल मेटकर(अमरावती), ओडिसी गुरु स्तुती साहू (मुंबई),मेघना साबडे ,रसिका गुमास्ते, नीलिमा हिरवे, अस्मिता ठाकूर, नेहा मुथियान, शमा पटणी-अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्याहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रती देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.

‘संस्कृतिकी’आयोजित इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते.१३ मार्च,१४ मार्च रोजी भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा महोत्सव पार पडला हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य होता.

इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हलचे संस्थापक श्यामहरी चक्र,समन्वयक रसिका गुमास्ते,सहाय्यक नेहा मुथियान,अस्मिता ठाकूर,शमा अधिकारी यांनी या महोत्सवासाठी सहकार्य केले.

पहिल्या दिवशी समूह नृत्यप्रकार,तर दुसऱ्या दिवशी एकल(सोलो) नृत्यप्रकार सादर करण्यात आले.ज्ञानेश्वरांच्या अभंगावरील नृत्याने डान्स फेस्टिव्हलची सुरुवात झाली.डान्स फेस्टिव्हल तीन सत्रांमध्ये झाला.नेहा मुथियान,इशिता घोषाल,शारीवा पोंक्षे,साक्षी गीते यांनी सूत्रसंचालन केले.

इंडिया डान्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये ७५ स्त्री-पुरुष कलाकारांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राबाहेरील कलाकार देखील या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले.या ओडीसी,कथक,मोहिनी अट्टम,भरत नाट्यम्‌,सत्रीय हे नृत्यप्रकार कलाकारांनी सादर केले.सोलो,समुह नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. सर्व नृत्य कलाकारांना भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: