टेम्पो चालक मालकांचा मोर्चा

पुणे -: टेम्पो चालक मालक यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात हांडेवाडी येथे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी टेम्पो चालक मालकांनी आपल्या वेगवेगळ्या व्यथा मांडल्या.

1) मोटार वाहन कायद्यामध्ये टेम्पो चालक मालकांचा संदर्भामध्ये करण्यात आलेली भरमसाठ दंडाची दरवाढ कमी करण्यात यावी.
2) विनाकारण पोलीसांकडून होत असणाऱ्या त्रासापासून टेम्पो चालक मालकांना संरक्षण मिळावे.
3) कोरोना मुळे कर्जाचे हप्ते भरण्यास दीरअंगाई झाल्यामुळे बँकांकडून टेम्पो चालक मालकांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी व हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.
4) ॲप बेस् कंपन्यांना माल वाहतूक व्यवसाय करण्यासाठी परवानगी देऊ नये.

या आंदोलनाला हमाल पंचायतीचे नितीन पवार व इतर पदाधिकारी टेम्पो चालक यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चामध्ये कामगार नेते सिताराम चव्हाण सखाराम पळसे अण्णा देवकर सनी शेवाळे सागर शेवाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले अतिशय कठीण परिस्थितीत टेम्पो चालक मालक जात असून व्यवस्थित हप्ते वेळेवर भरण्यासाठी चा धंदाही होत नाही. अशातच पोलीस विनाकारण पावत्या फाडून त्रास देण्याची भूमिका घेत आहेत. हे बरोबर नाही प्रामाणिकपणे व्यवसाय करून कुटुंब चालवण्याचा प्रयत्न टेम्पो चालक मालक हे करत असतात व आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना व्यवसाय करावा लागत आहे. अशा कठीण प्रसंगी शासनाने या सर्व टेम्पो चालक मालक यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
लवकरच या टेम्पो चालक मालकांचा राज्यव्यापी मेळावा पुणे येथे घेण्याचा निर्धार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला व त्याद्वारे सर्व टेम्पो चालक मालकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: