लायन्स् प्रौढ करंडक – दिक्षीत रॉयल्स् संघाला विजेतेपद

लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२२ स्पर्धा
पुणे :  लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिक्षीत रॉयल्स् संघाने दादाज् इलेव्हन संघाचा ८ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेचे सलग दुसर्‍यांदा विजेतेपद मिळवले.

सिल्व्हर क्रिकेट मैदान, चिखली येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दादाज् इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्विकारली. पण कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविण्यात फलंदाज अपयशी ठरले. त्यांचा डाव १७ षटकात ८७ धावांवर आटोपला. यामध्ये दर्शन वानगे (२१ धावा) आणि अजित पाटील (१७ धावा) यांनी संघाकडून थोड्याफार धावा जमविल्या. हे आव्हान दिक्षीत रॉयल्स् संघाने १०.४ षटकामध्ये व २ गडी गमावून पूर्ण केले. राहूल कामठे याने ३९ धावा आणि शिवदत्त पटणे २५ धावा करून संघाचा विजय सोपा केला व विजेतेपदावर आपले नाव कोरले.

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात अभिषेक मोहीते याच्या ६७ धावांच्या जोरावर डीएमटीसी अँड न्युक्लिअस इलेव्हन संघाने जाधव नाईट रायडर्स संघाचा ४१ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स अध्यक्ष लायन संतोश गायकवाड, लायन धनराज मंगनानी, लायन्स् पुणे रहाटणी क्लबचे अध्यक्ष लायन प्रमोद भोंडे, लायन वसंत कोकणे, लायन क्लबचे सर्व सभासद आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या दिक्षीत रॉयल्स् संघाला तसेच उपविजेत्या दादाज् इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अभिषेक मोहीते (डीएमटीसी अँड न्युक्लिअस इलेव्हन), सर्वोत्कृष्ट फलंदाज- राहूल कामठे (दिक्षीत रॉयल्स्), सर्वोत्कृष्ट गोलंदाज- विक्रम कैया, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रितम कैया अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम सामनाः
दादाज् इलेव्हनः १७ षटकात १० गडी बाद ८७ धावा (दर्शन वानगे २१, अजित पाटील १७, महेश दिवटे १२, पुष्कराज जोशी ३-१३, राहूल कामठे २-३, रघुनाथ शिंगाडे २-१५) पराभूत वि. दिक्षीत रॉयल्स्ः १०.४ षटकात २ गडी बाद ८८ धावा (राहूल कामठे ३९ (२८, ७ चौकार), शिवदत्त पटणे २५, पुष्कराज जोशी १५, महेश दिवटे १-१३); सामनावीरः राहूल कामठे;

Leave a Reply

%d bloggers like this: