पुणे महापालिकेवर उद्यापासून प्रशासक; महापौर मुरलीधर मोहोळ स्वतःच्या कार मध्ये गेले घरी

पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका पदाधिकारी त्यांची वाहने जमा करतात. मात्र पुणे महापालिकेच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपले शासकीय वाहन जमा केले. महापालिकेत महापौरपदाचे वाहन जमा केल्यानंतर त्यांनी ते आपल्या स्वतःच्या कार मध्ये घरी गेले. पु

णे महापालिका सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहे. आयुक्त विक्रम कुमार पाटील प्रशासक म्हणून आता पालिकेचे प्रमुख असणार आहेत. महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 तारखेला संपुष्टात आला असून आता प्रत्येकजण निवडणूक लागणार कधी याची वाट पाहत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: