ॲड. प्रवीण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत – तेजस मोरे

पुणे : आपल्या कार्यालयात तेजस मोरे याने भेट दिलेल्या घड्याळात स्पाय कॅमेरा बसविला होता. त्यातून हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. यावर तेजस मोरे यांनी आपली बाजू मांडली. तेजस मोरे यांनी सांगितले की.ॲड.प्रवीण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ अथवा छुपा कॅमेरा बसविला नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत.असे तेजस मोरे म्हणाले.

ॲड. चव्हाण यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत तेजस मोरे यांनी सांगितले की, मी सुरुवातीला त्यांना देव मानत होतो. मी ५ महिने तुरुंगात होतो. त्यांनी जामीनावर माझी सुटका केली. त्यांच्या कार्यालयात असताना एकदा त्यांच्या इंग्रजी ग्रामरमधील काही चुका मी दुरुस्त केल्या होत्या. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेकांचे जबाब मी नोंद केले आहेत. मला कायद्याचे ज्ञान नसल्याने असे जबाब तयार करुन देण्याचे सरकारी वकीलाचे कामच आहे, असा माझा समज होता.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी तयार केले. ९ जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी भोईटे व इतरांच्या जळगावमधील घरी छापे घातले. पुणे पोलिसांनी भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट केले होते. तेव्हापासून मी ॲड. चव्हाण यांच्यापासून दूर गेलो असल्याचा गौप्यस्फोट मोरे यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: