हेमंत रासने यांना अंदाजपत्रक मांडू देणार नाही – प्रशांत जगताप
पुणे : महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर त्याचाच भाग असलेल्या स्थायी समितीचीही मुदत संपते. तरीही भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अर्थसंकल्प मांडण्याचा हट्ट पकडला आहे.तो सोडून द्यावा. आम्ही तुम्हाला अंदाजपत्रक मांडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हेमंत रासने यांना दिला.
प्रशांत जगताप म्हणाले, महापालिकेला पाच वर्षाची असल्याने सहाव्या वर्षाचे अंदाजपत्रक मांडता येत नाही. असे असता स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे अंदाजपत्रक मांडण्यासाठी खटाटोप करत आहेत. कायद्यानुसार आमची मुदत १४ मार्च आहे, १५ मार्च पासून हे सभागृह अस्तित्वात राहणार नाही. तरीही सत्ताधाऱ्यांचा सगळा अट्टहास पाहता १४ मार्च रोजी महापालिका आयुक्तांनी पोलिस बंदोबस्त ठेवावा. भाजपला उपसूचनांद्वारे अंदाजपत्रक मंजूर करू देणार नाही. असे प्रशांत जगताप म्हणाले.
