महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत झालेल्या कराराची  प्रत मिळावी यामागणीसाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे आमरण उपोषण

पुणे:   कालच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घाईघाईत कार्यकारणीची बैठक घेऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख  जाहीर केली ….आनंद झाला , परंतु कुमार राज्य कुस्ती अधिवेशन व युवा राज्य कुस्ती अधिवेशन कधी होणार हा प्रश्न अजुन अनुत्तरित आहेच ? बरं   31 मार्च नंतर ही स्पर्धा होत असल्याने ही स्पर्धा पुढील चालु आर्थिक वर्षात धरली जाणार मग चालु 2021 / 22 आर्थिक वर्षाचा शासकीय मानधन महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना मिळणार नाही त्याचे उत्तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे आहे का ? असेल तर लेखी पुराव्या सहीत त्यांनी जाहीर करावे  अशी मागणी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य संदीप भोंडवे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे आमरण उपोषण पुण्यात दोन दिवसापासून गणेश कला क्रीडा मंच
येथे सुरू आहे.

या आमरण उपोषणाला काका पवार,योगेश दोडके, व मोठ्या प्रमाणात कुस्तीगीर उपस्थित होते.
संदीप भोंडवे म्हणाले, मागील अनेक दीवसापासुन सातारा , अहमदनगर  व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ सर्व प्रकारच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याबाबत ईच्छुक असताना ही कुस्तीगीर परिषदेने जाणुन बुजुन या स्पर्धा त्यांना दील्या नाहीत , महाराष्ट्रातील गोर गरीब कुस्तीगीरांचे करोडो रुपयांचे शासकीय मानधन बुडले तरी चालेल परंतु ही स्पर्धा एखादा उद्योगपतीच घेणार हा चंग कुस्तीगीर परिषदेचा संभाव्य वारसदारांनी बांधला व पुर्ण ही केला. 2020 व 2021  या दोन वर्षाचे महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे करोडो रुपयांचे शासकीय मानधन फक्त कुस्तीगीर परिषदेतील काही मनमानी करणा-या पदाधिका-यांच्या हट्टापाई बुडत असेल तर धिक्कार आहे अशा पदाधिका-यांचा गाव आहे असे संदीप भोंडवे म्हणाले

Leave a Reply

%d bloggers like this: