सन्मान स्विकारण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद मिळतो- आशा काळे

पुणे : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले पण सन्मान देण्यात जो आनंद मिळतो तो घेण्यात नाही.असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा काळे यांनी केले. श्री तुळशीबाग गणपती मंडळ तुळशीबाग व्यापारी असोसिएशन गणपती चौक दुकानदारांची व्यापारी संघटना आणि पुना गेस्ट हाऊस यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्यावसायिक महिलांचा सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

स्त्री ला परमेश्वराने अधिकचे गुणांची देणगी दिली आहे त्याचा वापर आपल्या व्यवसायात करुन यशस्वी झाले पाहिजे….तसेच त्यांनी आपल्या आयुष्यातील काही घटनांना उजाळा दिला…तुळशीबागेशी लहानपणापासून असणारे नाते त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले….
तुळशीबाग….महिलांचे माहेरघर…महिलांच्या खरेदीचे आवडते ठिकाण….महाराष्ट्रातून कोणतीही महिला पुण्यात आल्यावर तिला तुळशीबागेत खरेदीचा मोह झाल्याशिवाय राहत नाही..अशी ही तुळशीबाग …..पण जरी तुळशीबाग महिलांच्या वस्तू मिळण्याचे ठिकाण असले तरी येथे काही महिला व्यावसायिक म्हणून आपला ठसा उमटवत आहेत……अशाच तुळशीबागेतील व्यावसायिक कर्तृत्ववान महिलांचा तसेच पुण्यातील व्यावसायिक महिला भगिनींचा सन्मान आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला…
सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडित, मोहन साखरीया संजीव फडतरे, किरण चौहान, दुर्गेश नवले, रविंद्र रणधीर पुना गेस्ट हाऊस चे किशोर सरपोतदार गणपती चौक दुकानदारांची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मूनोत,प्रमोद लोढा, प्रशांत टिकार साधना सरपोतदार, शर्मिला सरपोतदार अभिनेत्री वाळके, स्वप्नाली पंडित, सुप्रिया ओतारी, दिक्षा माने,सुनिता चौहान, सोनी पवार, सारीका ओतारी,स्वाती ओतारी
उपस्थित होते..
तुळशीबागेतील अरुणा बोथरे , सरस्वती हेंन्द्रे, दिपा पाठक, अंजली घम, प्रिया कोठाडिया, काजल मेहता आणि समिरा जंगिरा या महिलांना सन्मानित करण्यात आले
सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन नितीन पंडित तथ आभार प्रदर्शन जीगर शहा यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: