महाराष्ट्र राज्य 8 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली महाराष्ट्र राज्य 8 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटाच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळातर्फे सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे 12 ते 13 मार्च 2022 रोजी पुण्यात 8 वर्षाखालील ही राज्य निवडचाचणी बुद्धिबळ स्पर्धा  होणार आहे.

या स्पर्धेत 150 हून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. ही स्पर्धा खुल्या मुले आणि मुलींच्या गटात होणार आहे. प्रत्येक गटात 10000/- अशी पारितोषीक रक्कम देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या 8 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 1 जानेवारी 2014 नंतर जन्मलेल्या किंवा त्यानंतरचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये निवडलेले खेळाडू 800/- भरून खेळू शकतात आणि इतर 1500/- ची डोनर एंट्री भरून भाग घेऊ शकतात.

प्रवेशाची अंतिम तारीख 10 मार्च 2022 आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या संचालक आयए विनिता श्रोत्री यांना 9850439239 या क्रमांकावर आणि पीडीसीसीचे सचिव डॉ संजय करवडे यांच्याशी 9404983301या  क्रमांकावर संपर्क साधा.

Leave a Reply

%d bloggers like this: