जागतिक महिला दिन भारती विद्यापीठ आय एम ई डी मध्ये साजरा
पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी ) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार,उद्योजक पूजा तहलियानी,डॉ शिवाजी इंगवले,डॉ.शिल्पा सुरेश,डॉ.संगीता शिरोडे,विषाखा दोशी यांचा सत्कार करण्यात आला .
डॉ भारती जाधव,डॉ स्वाती देसाई,डॉ सोनाली खुर्जेकर,डॉ श्रद्धा वेर्णेकर,डॉ अनुराधा येसुगडे,डॉ.रणप्रीत कौर,डॉ श्वेता जोगळेकर,डॉ हेमा मिरजी ,डॉ सुजाता मुळीक, संगीता पाटील,प्रतिमा गुंड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.