Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे; एक भाग पडला

महापालिकेच्या कामाची तातडीने चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले आहे. यामुळे महापालिकेच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावर राष्ट्रवादीने ‘भाजपा म्हणजे मनी नाही भाव अन् देवा मला पाव, असा प्रकार असल्याची टीका करीत महापालिकेच्या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, “मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले. परंतु श्रीपाद छिंदम असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपाचा शिवरायांबाबतचा आकस सातत्याने दिसून आला असून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडला आहे.”

देशमुख पुढे म्हणाले की, “भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे.” केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.

संबंधीत बातमी –

मेघडंबरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या निषेधार्थ वंचित कडून महापौर कार्यालयात शाईफेक https://maharashtralokmanch.com/2022/03/07/deprived-of-protest-against-poor-quality-of-meghadambari-work-in-the-mayors-office/

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading