भारताच्या डिजीटल परिसंस्थेला चालना देण्यासाठी अॅक्सिस बँक आणि एअरटेल यांची भागीदारी
नवी दिल्ली : भारताची खाजगी क्षेत्रातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेली अॅक्सिस बँक आणि भारतातील प्रमुख संवाद सुविधा पुरवठादार असलेले भारती एअरटेल यांनी वित्तीय सुविधांच्या मालिकेतून भारताच्या डिजीटल परिसंस्थेच्या विकासाला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी करत असल्याचे आज जाहीर केले.
देशात डिजीटल पेमेंटच्या अंगीकाराला चालना देताना आगामी महिन्यात अॅक्सिस बँक आणि एअरटेल खास एअरटेलच्या ३४० दशलक्षाहून अधिक ग्राहकांसाठी बाजारात डिजिटल सेवा आणि नाविन्यपूर्ण आर्थिक सुविधांची मालिका सादर करणार आहे. यामध्ये उद्योग पूरक लाभांसह को-ब्रँडेड क्रेडीट कार्ड, पूर्व संमती तत्काळ कर्ज सुविधा, बाय नाऊ पे लेटर सारख्या सवलती, योजना यांचा समावेश असेल. या भागीदारीतील सहयोगी कंपन्यांची देशभरात असलेली प्रचंड पोहोच टियर २ आणि टियर ३ शहरांमधील बाजारपेठांमध्ये डिजीटल पेमेंट्सची क्षमता विस्तारण्यासाठी मदत करेल.
या भागीदारीची सुरुवात आज पहिलेवहिले ‘एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडीट कार्ड’ सादर करून झाली. या कार्डद्वारे वापरकर्त्याला कॅशबॅक, विशेष सवलती, डिजिटल व्हॉऊचर आणि एअरटेल ग्राहकांना विशेष सदिच्छा सेवा मिळणार आहेत.
एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडीट कार्ड धारकांसाठी उपलब्ध सुविधा –
- एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंट्स वर २५% कॅशबॅक
- एअरटेल थँक्स अॅप द्वारे वीज/गॅस/पाणी बिल पेमेंट्स वर १०% कॅशबॅक
- बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो यांवरून केलेल्या खरेदीवर १०% कॅशबॅक
- इतर सर्व खर्चांवर १% कॅशबॅक
- कार्ड इश्यू केल्यापासून कार्ड अॅक्टीव्हेशनवर ५०० रुपयांचे अॅमेझॉन इ-व्हाऊचर
या भागीदारीबद्दल बोलताना अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, “अॅक्सिस बँकेत आम्ही सातत्याने आमच्या भागधारकांसाठी मूल्यवर्धन करायच्या प्रयत्नांत असतो. अशा प्रकारच्या सहयोगातून एअरटेलच्या ३४० दशलक्ष ग्राहकांसाठी अॅक्सिस बँकेच्या क्रेडीट कार्डचा अॅक्सेस विस्तृत करायला आणि विविध डिजिटल वित्तीय सेवा सादर करायला मदत मिळेल.”
भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल म्हणाले, “एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी जागतिक दर्जाच्या डिजिटल सेवासुविधा पुरविताना आपल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून वित्तीय सेवा पोर्टफोलिओ उभारत आहे. या सर्वार्थाने उत्तम टेलीकम्युनिकेशन-बँक भागीदारीतून एअरटेल ग्राहकांना अॅक्सिस बँकेच्या जागतिक दर्जाच्या वित्तीय सेवा पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभांचा अॅक्सेस मिळेल.”
