Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

विज्ञानाश्रम आयोजित ‘टेक्नोवेशन’ प्रदर्शनाला शनीवारी चांगला प्रतिसाद

पुणे : विज्ञानाश्रम संस्थेच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‘टेक्नोवेशन’ या प्रदर्शनाचे आयोजन आज करण्यात आले होते.

जे. पी. नाईक सेंटर, एकलव्य कॉलेज च्या पाठीमागे, कोथरुड डेपो, पुणे येथे दुपारी १ ते ४ चा वेळात हे प्रदर्शन खुले होते .सकाळी 11 वाजता त्यांचे उद्घाटन एल अॅण्ड टी इन्फोटेकचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यूष पांड्या , सुनील लोखंडे व सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिझाईन, इनोव्हेशन सेंटरच्या समन्वयक डॉ. पूजा दोशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले यांच्या उपस्थितीत झाले.

सचिन पुणेकर यांनी प्रास्ताविक केले. नीलम हिरवे यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त न्यायाधीश एस.डी. गोखले, वसिम शेख, ओंकार बाणाईत हे मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान आश्रम चे संचालक डॉ योगेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. महेंद्र भोर यांनी आभार मानले.
हे प्रदर्शन ऑनलाइन स्वरूपात पण http://www.technovision.online/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचे उद्घाटन सुनील लोखंडे यांनी केले.

दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय (चिखली ), न्यू इंग्लीश स्कूल (धामारी ),आदर्श विद्यालय ( आंबोली ) या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

प्रत्यूष पांड्या म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना स्वतःच अडचणींवर संशोधन करून उत्तर शोधण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.विज्ञान,नव संकल्पना लहान वयात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे देशाच्या प्रगतीसाठी, ग्रामीण भारतासाठी आवश्यक आहे.एल अँड टी कंपनीचा सीएसआर विभाग आणि विज्ञानाश्रम नेहमी या उपक्रमांना पाठिंबा देईल.

शाळेतील मुलांना विज्ञान व तंत्रज्ञान याची गोडी लागुन भविष्यामध्ये आपल्या आवडीच्या विषयामध्ये करियर करता यावे व संशोधक वृत्ती विकसित व्हावी यासाठी विज्ञान आश्रम पाबळ यांच्या वतीने महाराष्ट्र, छत्तीसगड व उत्तरप्रदेश येथील १60 + शाळांमध्ये ८वी ते १० वी च्या मुलांना मुलभुत तंत्रज्ञानाची तोंडओळख (Introduction to Basic Technology) या विषयाचे शिक्षण दिले जाते. यासाठी विविध कंपन्यांची मदत होत असते. पुण्यामध्ये वन स्टेप – एल अँड टी इन्फोटेक या कंपनीच्या सहकार्यांने १५ शाळांमध्ये हा उपक्रम चालु आहे, अशी माहिती डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading